ना. उदय सामंत यांच्याकडून बटन फॅक्टरीची पाहणी

Aug 23, 2024 - 11:10
 0
ना. उदय सामंत यांच्याकडून बटन फॅक्टरीची पाहणी

गुहागर : तालुक्यातील वरवेली येथील बटन फॅक्टरीला राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. यावेळी अभिषेक इंटरप्राईजेसचे मालक पंढरी किर्वे यांनी ना. सामंत यांचे स्वागत केले. उद्योगमंत्री ना. सामंत यांनी कंपनीतील विविध विभागाची पाहणी करून माहिती करून घेतली. 

प्रगत असलेल्या राष्ट्रांमध्ये विक्री होणारे उत्पादन हे वरवेली सारख्या ग्रामीण भागामध्ये होत असल्याने समाधान व्यक्त केले. या कंपनीमध्ये परिसरातील ७० ते ७५ महिला व पुरुषांना रोजगार उपलब्ध केल्याबद्दल कंपनीचे मालक पंढरी किर्वे यांचे विशेष कौतुक केले. 

यावेळी रत्नागिरी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिंगाडे, गुहागर तहसीलदार परिक्षित पाटील, तसेच जिल्हा उद्योग केंद्र रत्नागिरीचे जनरल मॅनेजर प्रकाश हनबर, व्यवस्थापक हरिभाऊ आंधळे, लेखापाल एकनाथ शिरसाट, गणेश किर्वे, व्यवस्थापक दीपक झगडे उपस्थित होते. यावेळी मंत्री सामंत यांनी ग्रामीण भागामध्ये उद्योग निर्माण करून अनेकांना रोजगार दिल्याबद्दल पंढरी किर्वे यांचे कौतुक केले. तसेच यापुढेही आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 23-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow