खेडमध्ये तरुणाला तिघांकडून बेदम मारहाण

Aug 23, 2024 - 12:07
Aug 23, 2024 - 12:50
 0
खेडमध्ये  तरुणाला तिघांकडून बेदम मारहाण

खेड : किरकोळ कारणातून तरुणाला बॅटने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तालुक्यातील काडवली गजवाडी येथे १९ ऑगस्टला सायंकाळी घडला. दीपक लक्ष्मण वारणकर, रामचंद्र सखाराम वारणकर, स्वाती दीपक वारणकर (सर्व रा. काडवलीगजवाडी, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघा संशयितांची नावे आहेत. फिर्यादी हे घरी एकटेच असताना तिघांनी फिर्यादी यांचे घरामध्ये घुसून शिवीगाळी दमदाटी करून घरातून ओढत खेचत बाहेर आणले. बॅटने मारहाण केली आहे. त्यानंतर फिर्यादी त्याच्या अंगणात नेऊन त्याचे दोन्ही हात दोरीने बांधून फिर्यादीला लाकडी मेढीला बांधून ठेवले. लाकडी बॅटने त्याच्या पाठीवर, दोन्ही हातावर, दोन्ही पायावर, कमरेवर मारहाण केली आहे. तसेच ग्रामस्थ विठ्ठल गुणाजी धाडवे हे त्यांच्या घराजवळून जात असताना फिर्यादीला मारत असल्याचे पाहून त्याठिकाणी थांबले म्हणून त्यांनाही मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:14 PM 23/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow