चिपळूणातील विरेश्वर तलाव बनलाय 'नरिमन पॉईंट'

Aug 13, 2024 - 10:52
Aug 13, 2024 - 15:55
 0
चिपळूणातील विरेश्वर तलाव बनलाय 'नरिमन पॉईंट'

चिपळूण : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या पाठीमागे प्रसिद्ध असा विरेश्वर तलाव आहे. विरेश्वर मंदिरानजिक हा तलाव आहे. सद्यस्थितीत हा तलाव चिपळूणचा नरिमन पॉईंट बनला आहे. श्रावणी सोमवारी (दि. १२) श्री विरेश्वराच्या दर्शनासाठी येणारे अनेक युगुल या ठिकाणी पाहायला मिळाले आणि त्याची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे.

चिपळुणातील अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी विरेश्वर तलाव आहे. सद्यस्थितीत या तलावाची दुरवस्था झाली आहे. तलावातील पाण्याला दुर्गंधी येत आहे. तलावाच्या ठिकाणी वॉकिंग ट्रॅक करण्यात आला आहे.

या ठिकाणी झाडीही वाढली आहे. नेमका याच झाडीचा फायदा तरूण तरूणी घेत आहेत. एका बाजूला बसस्थानक, विरेश्वर मंदिर आणि दुसऱ्या बाजूला नागरी वस्ती अशी रहदारीची जागा असताना देखील हे तरूण-तरूणी आपल्याच विश्वात रंगत आहेत. कधी झाडाझुडुपाचा आडोसा... कधी छत्रीचा आडोसा... घेत रंग उधळले जात आहेत. मात्र, आपल्याकडे कोणाच्या नजरा लागून आहेत याचे भान मात्र त्यांना नाही. तलावाच्या कट्ट्यावर बसून तर कधी बाकावर बसून नको ते चाळे करण्यात येत आहेत आणि आसपास असणारे काही लोक ते पाहून त्याची रंगतदार चचदिखील करीत आहेत. त्यामुळे चिपळूणचा विरेश्वर तलाव यंगस्टर्ससाठी 'नरिमन पॉईंट' बनला आहे.

शहरातील या प्रसिद्ध तलावावर चालणाऱ्या प्रकारची चिपळूण पोलिसांनी दखल घेत त्यांना पायबंध घालावा, अशी मागणी सुजाण नागरिक मागणी करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:21 PM 13/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow