शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी.., आतापर्यंत 10 पैकी 10 जागांवर आघाडी

Jun 4, 2024 - 10:58
Jun 4, 2024 - 10:59
 0
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी..,  आतापर्यंत 10 पैकी 10 जागांवर आघाडी

मुंबई : महाराष्ट्रातील 48 जागांचे सुरुवातीचे कल समोर आले आहेत. त्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली आहे. शरद पवारांनी महाविकास आघाडीमध्ये 10 जागांवर निवडणूक लढवली होती, त्या दहाही जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत.

अजित पवारांनी फारकत घेतल्यानंतर शरद पवार यांनी नव्या जोमानं पक्ष बांधणी केली. दिवसरात्र प्रचार करत लोकसभेत मोठं यश मिळावलं आहे. 11 वाजेपर्यंतच्या कलामध्ये 10 जागांवरील सर्व उमेदवार आघाडीवर आहेत. दिंडोरीमध्ये राज्यमंत्री भारती पवार आणि भिवंडीमधील राज्यमंत्री कपिल पाटील यांना झटका बसलाय.सुरुवातीच्या कलामध्ये हे दोन्ही उमेदवार पिछाडीवर असून शरद पवार यांचे उमेदवार

बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंची मोठी आघाडी -

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे देशाचं लक्ष लागले होते. कारण, पवार घरण्यातील दोन उमेदवार मैदानात होते. शरद पवार यांच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या पक्षाकडून सुनेत्रा पवार मैदानात होत्या. सुरुवातीच्या कलामध्ये सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतली होती. पण त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी जोरदार मुसंडी मारत मोठी आघाडी घेतली. चौथ्या फेरीनंतर सुप्रिया सुळे यांनी तब्बल 19 हजार मतांची आघाडी घेतली आहे.

शिरुरमध्ये तुतारी वाजली -

पाचव्या फेरी अखेर शिरुरमधुन अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. अमोल कोल्हे यांनी 25088 मतांनी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.

बीडमध्ये पंकजा मुंडेंना झटका -

बजरंग सोनवणे यांनी तब्बल 8 हजार मतांची आघाडी घेतली आहे. पाचव्या फेरीनंतर पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जातोय.

सातऱ्यात शशिकांत शिंदेंनी मोठी आघाडी घेतली आहे. उदयनराजे भोसले यांना मोठा झटका बसला आहे.

दिंडोरी -

चौथी फेरीअखेर भास्कर भगरे 6989 मतांनी पुढे आहेत. मंत्री भारती पवार पिछाडीवर आहेत.

माढा -

भाजपचे रणजीतसिंह निंबाळकर पिछाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

रावेर

रावेरमधून राष्ट्रवादी एस पी श्रीराम पाटील यांनी दहा वाजेपर्यंत आघाडी घेतली होती. रावेरमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

भिवंडी -

भिवंडीमध्ये राज्यमंत्री कपिल पाटील यांना जोरदार धक्का बसला आहे. बाळ्यामामा म्हात्रे यांनी मोठी आघाडी घेतली आहे

वर्धा -

वर्ध्यामधून 11 वाजेपर्यंत अमर काळे आघाडीवर आहेत.

अहमदनगर दक्षिण -

भाजपचे सुजय विखे पाटील पिछाडीवर आहेत. निलेश लंके यांनी 11 वाजेपर्यंतच्या कलामध्ये मोठी आघाडी घेतली आहे.

महाविकास आघाडीची मुसंडी -

राज्यातील 48 जागांमध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांना मोठी आघाडी मिळाली आहे. ठाकरेंचे 8, शरद पवारांचे 10 आणि काँग्रेसचे 10 उमेदवार आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीचे 28 उमेदवार आघाडीवर आहेत. तर महायुतीला 19 जागांवर आघाडी आहे. एक अपक्ष सध्या आघाडीवर आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 04-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow