लांजा : उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या मार्गाला मंजुरी मिळावी : लांजा शहर समन्वय समिती

Aug 24, 2024 - 10:14
Aug 24, 2024 - 15:16
 0
लांजा : उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या मार्गाला मंजुरी मिळावी : लांजा शहर समन्वय समिती

लांजा : लांजा शहरातून जाणाऱ्या जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्ग उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या मार्गास विशेष बाब म्हणून मंजुरी मिळावी, अशी मागणी लांजा शहर समन्वय समितीच्यावतीने करण्यात आली असून तसे निवेदन मंगळवारी लांजा तहसीलदार यांना देण्यात आले.

लांजा शहर समन्वय समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चे काम सध्या सुरू आहे. शहरातील कोर्ले तिठा ते साटवली रोड तिठा या अंतरासाठी सलोह सांधानकातून खांब (आरसीसी पिलर) उभारून उड्डाणपूल प्रस्तावित आहे. त्यानंतर साटवली रोड तिठा ते एसटी डेपो या अंतरासाठी मातीच्या भरावातून पुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे.

मातीच्या भरावातून जाणारा ५४० मीटर अंतरासाठी उड्डाणपूला खालून जाणारा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणताही मार्ग प्रस्तावित केलेला नाही. या ७५० मीटर अंतरावर रस्त्याचे पूर्वेकडील भागात तहसीलदार कार्यालय, पोलिस ठाणे, लांजा हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, तालुका भूमी अभिलेख कार्यालय, तलाठी व मंडळ कार्यालय इत्यादी अनेक कार्यालये कार्यरत आहेत तर रस्त्याच्या पश्चिमेकडील बाजूला आरडीसीसी बैंक, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती कार्यालय, स्टेट बँक, सारस्वत बँक, मराठी शाळा, शॉपिंग सेंटर आधी शासकीय, निमशासकीय कार्यालयांचा समावेश आहे.

 नियोजित असलेल्या आराखडाप्रमाणे उड्डाणपुलाचे बांधकाम झाल्यास शालेय विद्यार्थी शहर व खेडेगा गावातून तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयीन कामासाठी व वैद्यकीय उपचारासाठी येणारे लोक यांचा विचार करता हे ५४० मीटर लांबीचे क्षेत्र हे अत्यंत वर्दळीचा भाग आहे. दिवसभरात या रस्त्यावरून चार ते पाच हजार इतक्या संख्येने लोक ये-जा करत असतात. रहदारीचा विचार करता दुचाकी व चार चाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी उड्डाणपुलाखाली मार्ग असणे आवश्यक आहे. अन्यथा लांजा शहर आणि तालुक्यातील कामासाठी येणारे नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.

यावेळी लांजा शहर समन्वय समितीचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, उपाध्यक्ष प्रकाश लांजेकर, सचिव चंद्रशेखर स्वामी, सहसचिव निरंजन देशमुख, जयवंत शेट्येट, महंमद रखांगी, विजय कुरूप, विठोबा लांजेकर, अभिजित जेधे, प्रभाकर शेट्ये, राजेश राणे, विजय सोलगावकर, पांडुरंग जाधव, देवदत्त शेट्ये, सचिन लिंगायत, महेश सप्रे, मंदार भिंगारडे आदी उपस्थित होते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:42 PM 24/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow