लांजात महायुतीकडून शरद पवारांचा निषेध

Sep 13, 2024 - 11:47
 0
लांजात महायुतीकडून शरद पवारांचा निषेध

लांजा : लांजा तालुका महायुतीकडून गुरुवारी लांजा तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शरद पवार यांच्या निषेधाच्या घोषणा महायुतीकडून देण्यात आल्या. 

संभाजी ब्रिगेडच्या जाहीर कार्यक्रमात खासदार शरद पवार यांच्यासमोर हिंदू देवतांबद्दल आणि संतांबद्दल अपमानकारक वक्तव्य करण्यात आले होते. या प्रकरणी महायुतीकडून लांजा येथे खासदार शरद पवार यांचा जाहीर निषेध करण्यात आला. लांजा तहसील कार्यालयासमोर करण्यात आलेल्या निषेधामध्ये भाजपाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, शहराध्यक्ष गुरुप्रसाद तेली, त्याचप्रमाणे तालुका सरचिटणीस विराज हरमले, शैलेश खामकर, ज्येष्ठ पदाधिकारी विजय कुरूप, नगरसेवक संजय यादव तसेच आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 13-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow