रत्नागिरीचे तत्कालीन डीवायएसपी विनीत चौधरी यांना राष्ट्रपती पदक

Aug 24, 2024 - 19:20
Aug 24, 2024 - 19:23
 0
रत्नागिरीचे तत्कालीन डीवायएसपी विनीत चौधरी यांना राष्ट्रपती पदक

पालघर : रत्नागिरीचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी यांना आपल्या गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल राष्ट्रपती पदक मिळाले आहे. महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते त्यांना १५ ऑगस्ट २०२४ रोजी सन्मानित करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी यांनी यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात आपली सेवा बजावली होती. त्याचसोबत रायगड, ठाणे, भिवंडी, मुंबईतील विशेष सुरक्षा दल, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई अशा विविध ठिकाणीही ते सेवेत होते. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी रत्नागिरीत आपली ओळख निर्माण केली होती. अनेक गुंतागुतीच्या गुन्ह्यांचा देखील त्यांनी कौशल्याने तपास करून आरोपींना गजाआड केले होते. कायदा व सुव्यवस्था राखताना परिस्थिती कशी हाताळावी? याचे त्यांना चांगले ज्ञान होते. कायद्याच्या असणाऱ्या सखोल अभ्यासामुळे त्यांनी न्यायालयात देखील अनेकवेळा सरकारी पक्षाची बाजू मोठ्या सफाईदारपणे मांडली होती. त्यांच्या या कौशल्यामुळे आणि अनुभवामुळे अनेक उच्चपदस्थ अधिकारी देखील अनेकवेळा त्यांचा सल्ला घेत असत. सध्या ते अलिबाग येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी २०१७ मध्ये पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाने देखील त्यांना गौरवण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी यांना मिळालेल्या या सन्मानामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी कोकण पट्ट्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow