शेतकरी हितासाठी 'वाशिष्ठी डेअरी प्रकल्प ' कटिबद्ध : प्रशांत यादव

Aug 26, 2024 - 11:46
Aug 26, 2024 - 14:48
 0
शेतकरी हितासाठी 'वाशिष्ठी  डेअरी  प्रकल्प ' कटिबद्ध : प्रशांत  यादव

चिपळूण : चिपळूण नागरी सरकारी पत्तसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी सहकाराच्या माध्यमातून सामाजिक नावलौकिक मिळवला आहे. तो वारसा वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून पुढे नेत असताना शेतक-यांच्या हितासाठी जे जे करता येईल, तिथे वाशिष्ठी डेअरी कमी पडणार नाही, अशी ग्वाही वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांनी देताना वाशिष्ठी डेअरी प्रकल्प भविष्यात शेतकऱ्यांचा प्रकल्प झाल्याशिवाय राहणार नाहीं, असे स्पष्ट मत केले. 

रत्नागिरी जिल्हा दुग्ध क्षेत्रात आर्थिक संपत्र प्रगतीवर नेण्याचे काम तुमच्यासारख्या मंडळीच्या सहकार्यातून करणार आहोत, असे प्रतिपादन यादव यांनी देवरुख येथे माटे-भोजने सभागृहात वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आगोजित शेतकरी मेळावा व कृषी कार्यशाळाप्रसंगी केले.

यावेळी व्यासपीठावर एडवेटा मैनेजर प्रतीक माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश बने, देवरुख तालुकाध्यक्ष बाबा साळवी, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, देवरुख शहराध्यक्ष नीलेश भुवड, माजी सभापती छोट्या गव्हाणकर, उबठा गटाचे तालुकाप्रमुख बंडया बोरकर, मुन्ना धरवळ, सी. एल. एफ. मॅनेजर ज्योती जाधव, देवरुख व्यापारी संघटना अध्यक्ष बाबा सावंत, मोहन बनकर, माजी सभापती संतोष लाड, पशुसंवर्धनच्या मानसी लोटणकर आदी उपस्थित होते.

यावेळी प्रांत यादव पुढे म्हणाले चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाची उभारणी झाली आहे. तत्पूर्वी कोकणातील शेतीपूरक दुग्ध व्यवसायासाठी चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी नेहमीच पाठबळ दिले आहे. मात्र, शेतकऱ्यांची दुधाची योग्य विक्री होत नव्हती. यामुळे आम्ही वाशिष्ठी डेअरी प्रकल्प सखोल अभ्यासांठी उभारण्याचा निर्णय घेतला आणि अल्पावधीतच हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या सेवेत रुजू देखील झाला आहे, असे सांगताना या प्रकल्पाच्या वाटचालीचा आढावा घेतला.

वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाची दुग्धजन्य उत्पादने कोकण, मुंबईसह नागपूरपर्यंत विक्रीसाठी जात आहेत. विशेष म्हणजे या उत्पादनांची दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. इथला शेतकरी प्रगल्भ झाला तर आर्थिकदृष्ट्या संपत्र होईल, असा विश्वास यादव यांनी यावेळी व्यक्त केला. शेतकऱ्यांना बळ देण्याची गरज आहे, मात्र दुधाला ५ रुपये अनुदान वाढवून देण्याला शासन तयार नाही, ती खऱ्या अर्थाने आजची शोकांतिका आहे, असे स्पष्ट मत प्रशांत यादव यांनी यावेळी मांडले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या कृषी कन्या श्रद्धा ढवण डोरमले यांनी दुग्ध व्यवसायाच्या वाटचालीची माहिती देताना दुग्ध व्यवसायातील बारकावे शेतकऱ्यांना समजावून सांगितले, यातून शेतकरी दुध व्यवसायात यशस्वी होऊ शकतो. असा विश्वास उपस्थित शेतकरी, मान्यवर व ग्रामस्थांना दिला. यावेळी साडवली सरपंच संतोष जाधव, राजू जाधव, नंदू जाधव, रविंद्र पवार, संजय नाखरेकर, प्रकाश पत्की, आनंदकुमार डोंगरे, शिवणे पोलीस पाटील मनोज शिंदे, काशिनाथ वाजे, खडी ओझरे सरपंच संतोष हातिम, लिंगायत, बबन पवार, खामकर, जयराम धावडे आदी उपस्थित होते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:16 PM 26/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow