रत्नागिरी : 'फिनोलेक्स'च्या १४ विद्यार्थ्यांची बेंचमार्क कंपनीत निवड

Aug 27, 2024 - 10:36
 0
रत्नागिरी : 'फिनोलेक्स'च्या १४ विद्यार्थ्यांची  बेंचमार्क  कंपनीत  निवड

रत्नागिरी : फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीच्या १४ विद्यार्थ्यांची बेंचमार्क या प्रसिद्ध आय.टी. कंपनीमध्ये नोकरीसाठी तसेच औद्योगिक प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. बेंचमार्क ह्या कंपनीचा प्लेसमेंट ड्राईव्ह २१ ते २३ ऑगस्ट या दरम्यान फिनोलेक्स अॅकॅडमीच्या कॅम्पसमध्ये आयोजित केला होता. या प्रक्रियेसाठी कंपनीतर्फे १८ अधिकाऱ्यांची टीम उपस्थित होती. या कंपनीमध्ये गौरेश तांबे (सीएसइ), सुमित राजम (सीएसइ), अफन फोंडू (सीएसइ), ओम परब (सीएसइ), जाफर बेलदार (आयटी), विष्ववेद केळकर (आयटी), रिद्धी मांजरेकर (आयटी), ऋषीकेश सुर्वे (आयटी), दिव्या वेरेकर (आयटी), यशोधन देवधर (आयटी), उझईफ इसानी (एमसीए), पांडुरंग शिरसाट (एमसीए), ओंकार माळवदे (एमसीए), प्रवत बेरा (एमसीए) यांची नोकरीसाठी निवड झाली आहे.

या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती डॉ. अरुणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद आणि अॅकॅडमीच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 27/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow