रत्नागिरीकरांसाठी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन

Aug 2, 2024 - 13:38
 0
रत्नागिरीकरांसाठी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन

रत्नागिरी : संयुक्त राष्ट्र महासंघामार्फत 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे दिनांक ७/८/२०२४ रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेत जयेश मंगल कार्यालय, माळनाका येथे रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. 

या महोत्सवामध्ये  जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या सर्व रानभाज्या आणि रानफळांची वैशिष्टे, गुणधर्म लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न असेल.या महोत्सवाचे खास आकर्षण 
▪️ रानभाज्या वापरून पाककला स्पर्धा 
▪️ रानभाज्यांचे विविध स्टॉल्स व विक्री 
▪️ रानभाज्या वापरून चविष्ट अशा तयार‌ केलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. 

पाककला स्पर्धतील विजेत्यांना तसेच उत्कृष्ट स्टॉलधारकांना लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे पारितोषिक दिले जाईल. ग्रामीण व शहरी भागातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टॉलधारकांकडून कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

स्टॉल नोंदणी दिनांक 5 ऑगस्ट पूर्वी करावी.
स्टॉल नोंदणीसाठी संपर्क क्रमांक 
लायन प्राची शिंदे - 9764417079
लायन साक्षी धुरी - 8767658080
लायन श्रेया केळकर 
8010192128

स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. रत्नागिरीतील सर्व नागरिकांनी या महोत्सवाला भेट देऊन या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन लायन्स क्लब रत्नागिरी तर्फे करण्यात येत आहे.

स्पर्धेचे सर्व नियम ठरवण्याचे अधिकार क्लब पदाधिकार्यांकडे रहातील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:06 02-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow