गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठ कोकण झोन बुद्धिबळ स्पर्धेचे सांघिक विजेतेपद

Aug 27, 2024 - 10:28
 0
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठ कोकण झोन बुद्धिबळ स्पर्धेचे सांघिक विजेतेपद

त्नागिरी : येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या पुरुष व महिला बुद्धिबळ संघाने मुंबई विद्यापीठ कोकण झोन पुरुष व महिला बुद्धिबळ संघिक स्पर्धेचे विजेतपद पटकावले.

ही स्पर्धा मुंबई विद्यापीठ, मुंबई व कोकण झोन आणि देवगड येथील शिक्षण विकास मंडळाचे एस. एच्. केळकर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने २३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत पार पडली. स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या पुरुष आणि महिला संघाने कोकण झोन बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पुरुष संघात ऋग्वेद सरजोशी, मानस सिदये, अनुज पुजारी, अथर्व देसाई, वेदांत सावर्डेकर, यश गोगटे आणि महिला संघात जिज्ञासा सावंत, अस्मिता खानविलकर, श्रेया परुळेकर, प्राची वळंजू, हिमानी फाटक, ग्येयता काळे या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले होते.

यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सर्व सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तिन्ही शाखांचे उपप्राचार्य, जिमखाना समितीचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे इत्यादींनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 27-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow