चिपळुणात महिलांसाठी दहीहंडी उत्सवाचे आयोजन

Aug 27, 2024 - 10:58
 0
चिपळुणात महिलांसाठी दहीहंडी उत्सवाचे आयोजन

चिपळूण : चिपळूण शहर परिसरामध्ये मंगळवारी (दि. २७) गोपाळकाला उत्सवामध्ये शहर परिसरात २२ सार्वजनिक व ३८० खासगी दहीहंडी उभारण्यात येणार आहेत. यावेळी खास बाब म्हणून प्रथमच खेर्डी येथील साई प्रतिष्ठान व साई प्लाझा यांच्या वतीने दोन दिवस दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये खास महिलांसाठी दहीहंडी व विविध स्पर्धा होणार आहेत.
दरवर्षी चिपळूण शहर परिसरामध्ये दहीहंडी उत्सव विविध स्तरावर मोठ्या उत्साहात साजरा होतो. प्रामुख्याने शहरातील विविध देवस्थानच्या माध्यमातून उत्सवाचे आयोजन केले जाते. यामध्ये वाणी आळी येथील श्री देव मुरलीधर मंदिर, ग्रामदैवत श्री देव जुना कालभैरव मंदिर, पाग येथील कृष्णेश्वर मंदिर, पाग रानडे आळी येथील गोपाळकृष्ण मंदिर, ब्राह्मणआळीतील लक्ष्मी नारायण मंदिर आदी ठिकाणांसह शहरातील अन्य देवस्थानांकडून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो.

गेली काही वर्षे राजकीय पक्ष व नेत्यांकडूनदेखील दहीहंडी उत्सवाचे आयोजन सुरू आहे.

प्रामुख्याने माजी आ. रमेश कदम व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे सरचिटणीस प्रशांत यादव याचबरोबर आ. शेखर निकम, भाजप, मनसे, छ. शिवाजी चौक मित्रमंडळ, भाजी मंडई मित्रमंडळ, छत्रे मारुती मित्रमंडळ, वडनाका मित्रमंडळ, महिला मंडळ, ओंकार मित्रमंडळ काविळतळी, छ. संभाजी चौक मार्कडी आदी ठिकाणी सार्वजनिक दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन तथा अबू ठसाळे यांनी खास महिलांसाठी दोन दिवस दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. बहादूरशेख नाका येथे साई प्रतिष्ठान व साई प्लाझा यांच्या विद्यमाने मंगळवार व बुधवारी महिलांकरिता दहीहंडी उत्सव होत आहे. प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीचा असणार आहे. बुधवारी खास महिलांसाठी दहीहंडी फोडण्याचे आयोजन केले आहे. कोकणात केवळ महिलांसाठी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्याचा उपक्रम ठसाळे यांनी प्रथम राबविला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 27/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow