रत्नागिरी : पूर्णगड जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक दहीहंडी

Aug 27, 2024 - 11:11
 0
रत्नागिरी : पूर्णगड जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक दहीहंडी

पावस : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पूर्णगड मराठी नंबर १ या शाळेत श्री शैक्षणिक दहीहंडी बांधण्यात आली. राया दहीहंडीचे विशेष म्हणजे मडक्यात शैक्षणिक वाचनकार्डे मराठी, गणित, से इंग्रजी ठेवण्यात आली होती.

तालुक्यातच नव्हे तर सर्वत्रच दहीहंडीचे वेध लागलेले आहेत. हंडी साजरी करण्यासाठी विविध संकल्पना राबविल्या जात आहेत. या सणांचे महत्त्व पटवून देण्यासाठी शाळास्तरावरही दहीहंडी साजरी केली जाते. तालुक्यातील पूर्णगड मराठी नंबर १ या शाळेत आगळीवेगळी संकल्पना राबवित शैक्षणिक दहीहंडी बांधण्यात आली. विद्यार्थ्यांनी हंडीसाठी थर रचून वरती लावलेले मडके फोडताच त्यामधून वाचनकार्डे खाली पडली. सहभागी विद्यार्थ्यांनी वाचनकार्ड एकत्र केली. शिक्षकांनी त्याचे मुलांकडून वाचन करून घेतले. तसेच विविध उपक्रम करून घेण्यात आले. मुलांनीही अनुभव सांगितले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व गुणांना वाव मिळाला. निपुण भारत उपक्रमांतर्गत पूर्णगड शाळेचा नावीन्यपूर्ण उपक्रम वेगळंपण जपणारा ठरला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, विद्यार्थी, मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी बीट पावस सायली सावंत, केंद्रप्रमुख उल्हास पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 27/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow