रत्नागिरी : जिल्ह्यात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा

Aug 28, 2024 - 10:07
 0
रत्नागिरी : जिल्ह्यात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा

त्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात दहीहंड्या फोडण्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांमध्ये उत्साह संचारला होता.

जिल्ह्यात यावर्षी २५१ सार्वजनिक आणि २ हजार ६१२ खासगी दहीहंड्या उभारण्यासाठी परवानगी घेण्यात आली होती. राजकीय पक्षांनीही दहीहंडीसाठी लाखो रुपये किमतीची बक्षिसे जाहीर केली होती. त्यामुळे दहीहंडीचा जल्लोष व पारितोषिके मिळविण्यासाठी मंडळामंडळांमधील चुरस व थरार अनुभवायला मिळाली. 

दरम्यान, जिल्ह्यात गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी दहीहंड्यांची संख्या कमी झाली. गेल्या वर्षी ३०९ सार्वजनिक, तर ३ हजार ४३ खासगी दहीहंड्या उभारण्यात आल्या होत्या. यावर्षी त्यात घट झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 28-08-2024



What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow