कोकणातील पर्यटनासाठी रेल्वेला पसंती

Aug 21, 2024 - 14:59
 0
कोकणातील पर्यटनासाठी रेल्वेला पसंती

चिपळूण : सलग सुट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेमार्गावर गुरुवारपासून विशेष जादा गाड्यांची सोय करण्यात आली होती. त्यामुळे पर्यटकांनी मुंबई-गोवा महामार्गाला फाटा देत रेल्वेने प्रवास करणे पसंत केले. त्यामुळे महामार्गावर फारशी गर्दी दिसून आली नाही.

सलग शासकीय सुट्या लागल्या की, मुंबई-पुण्यातील पर्यटक नेहमी कोकण आणि गोव्याकडे धावतात. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर नेहमी वाहनांची गर्दी पाहायला मिळते. मुंबई-पुण्यातील अनेक वाहने सीएनजीवर चालतात. त्यामुळे महामार्गालगत असलेल्या सीएनजी पंपावर पर्यटकांच्या वाहनांची मोठी रांग सुटीच्या हंगामात पाहायला मिळतेः मात्र या वेळी पर्यटकांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला फाटा दिल्याचे चित्र आहे.

गुरुवारी स्वातंत्र्यदिनाची सुटी होती शनिवार-रविवार शासकीय सुट्टी असल्यामुळे शुक्रवारची नियमित सुटी टाकून चार दिवस आनंद घेण्यासाठी अनेकजण सहकुटुंब घराबाहेर पडले. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण रखडलेले आहे. चौपदरीकरण झालेला रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. काम सुरू असलेल्या ठिकाणी अपघाताचा धोका आहे तसेच डांबरी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे पर्यटकांनी रस्त्याने न येता रेल्वेने प्रवास करण्यास पसंदी दिली. मध्यरेल्वेने या वेळी कोकण रेल्वेमार्गावर तब्बल १८ विशेष गाड्यांची सोय केली होती. त्यामुळे रेल्वेने पर्यटनस्थळ गाठणे पर्यटकांना सोयीचे ठरले. महामार्गावर सीएनजी पंप कमी आहेत. सीएनजी संपला की, वाहनांना दीर्घकाळ सीएनजी पंपावर वाट पाहत उभे राहावे लागते. त्यात निम्मा वेळ वाया जातो. त्यामुळे काही पर्यटकांनी या वेळी व रेल्वेला पसंती दिली आहे. कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या सर्वच रेल्वे या वेळी प्रवाशांनी भरलेल्या दिसून आल्या. रेल्वेस्थानकावरही प्रवाशांची गर्दी दिसून आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:28 PM 21/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow