Ratnagiri : दारू पिऊन सिव्हिलमध्ये धिंगाणा घालणाऱ्या 'त्या' डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

Aug 30, 2024 - 11:09
 0
Ratnagiri : दारू पिऊन सिव्हिलमध्ये धिंगाणा घालणाऱ्या 'त्या' डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयात मद्य प्राशन करून धिंगाणा घालणाऱ्या त्या डॉक्टरविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर त्या डॉक्टरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेला वाचा फुटल्याची चर्चा रत्नागिरीत सुरू आहे. अमरेश निखिलेश आगाशे असे संशयित डॉक्टरचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २७) पहाटेच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली होती. 

सोमवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात तरुणीच्या अत्याचारप्रकरणी रुग्णालयात लोकांनी गर्दी केली होती. रात्रभर रुग्णालयात रास्ता रोको, असे पडसाद उमटत होते. पहाटेच्यावेळी मद्य प्राशन करून संशयित डॉक्टर बनियन घालून रुग्णालयात दाखल झाले. त्याने सहकारी डॉक्टरशी वाद घातला व इतर नागरिकांशी हुज्जत घातली; मात्र डॉक्टरच्या तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे इतर सहकारी नर्स या चिडीचूप होत्या. संशयिताची हुज्जत सुरू होती. या डॉक्टरच्या प्रतापावर रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांनी आक्षेप घेतला. या प्रकरणाचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला; रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणी दखल घेतली. संबंधित संशयित डॉक्टरविरोधी तक्रारी वाढल्याने जिल्हा शल्यचिकित्सक भास्कर जगताप यांनी त्या डॉक्टरकडून घडलेल्या प्रकाराचा खुलासा त्याच्याकडून मागवला आहे. 

दरम्यान, या प्रकरणी डॉ. योगेश नागरगोजे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी त्या डॉक्टरविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. २८) रात्री मद्य प्राशन करून सरकारी व सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणे, शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 30-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow