रत्नागिरीत विधानसभेसाठी काँग्रेसही इच्छुक
रत्नागिरी : महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षानेसुद्धा रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मागण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या युवा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेश सचिव पर्शुराम खेत्री यांना आघाडीकडून उमेदवारी मागण्याचा ठराव करण्यात आला.
रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतील शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादीने यापूर्वीच दावा केला आहे. आघाडीचे अनेक कार्यक्रम, आंदोलने झाली त्यात आघाडीतील हे दोन्ही पक्ष संघटितपणे सहभागी झाले. या सर्व कार्यक्रमांसंदर्भात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे. त्याचबरोबर आयत्यावेळी आघाडी आहे. झाली नाही, तर उमेदवार नसण्याची झालेले पदाधिकारी. नामुश्की येऊ नये यासाठी काँग्रेसच्या युवा पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत परशुराम खेत्री यांना संभाव्य उमेदवार म्हणून निश्चित केले
रत्नागिरीतील खेडशी येथील खेत्री यांच्या निवासस्थानाच्या ठिकाणी असणाऱ्या काँग्रेस कार्यालयात नुकतीच बैठक झाली. यावेळी प्रदेश सचिव खेत्री यांच्यासह युवक जिल्हाध्यक्ष साजीद सरगुरोह, विधानसभा क्षेत्राध्यक्ष इरफान होडेकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष शैबाज होडेकर, शहर अध्यक्ष फहीम होडेकर, लांजा युवक तालुकाध्यक्ष खरात आदी उपस्थित होते.
या बैठकीत इच्छुक उमेदवार म्हणून परशुराम खेत्री यांची निश्चिती झाल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारीची मागणी करण्याचे ठरवण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 30/Aug/2024
What's Your Reaction?