लाडकी बहीण योजना बंद होणार नाही : अजित पवार

Aug 30, 2024 - 10:17
Aug 30, 2024 - 11:25
 0
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही : अजित पवार

बीड : राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, हा अजितदादांचा वादा आहे. या योजनेमुळे विरोधकांना पोटदुखी होत असून, काही जण न्यायालयात गेले आहेत; पण योजनेवर बालंट येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा बीडमध्ये गुरुवारी पोहोचली. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कृषिमंत्री धनंजय मुंडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, डॉ. योगेश क्षीरसागर, डॉ. सारिका क्षीरसागर, राजेश्वर चव्हाण यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

मिरवणुकीत घोषणाबाजी
अजित पवार हे बीडमध्ये आल्यानंतर त्यांची सभास्थळापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर त्या ठिकाणी बीड जिल्ह्यातील पतसंस्थांच्या ठेवीदारांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या काही महिला पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 30/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow