राजापूर : गणेशोत्सवापूर्वी दांडेपूल वाहतुकीसाठी होणार खुला

Aug 30, 2024 - 12:14
 0
राजापूर : गणेशोत्सवापूर्वी दांडेपूल वाहतुकीसाठी होणार खुला

राजापूर : तालुक्यातील सागाव येथील दांडेपुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्या पुलाची तातडीने पाहणी करून गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मिलिंद कुलकर्णी यांनी आमदार राजन साळवी यांना दिले.

राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांच्या अनुषंगाने आमदार डॉ. राजन साळवी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मिलिंद कुलकर्णी यांची भेट घेत मतवार संघातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा चर्चा केली. राजापूर तालुक्यातील सागाव विभागातील गेली ३ वर्षे नादुरुस्त असलेल्या दांडेपुलावर १० कोटी खर्च करून दुरुस्त करण्यात आला आहे. या पुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे कोकणचा महत्वाचा सण गणेशोत्सवापूर्वी वाहतूक विशेषतः एसटी वाहतूक सुरू करण्यासाठी पाहणी करून कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली तसेच  पश्चिम महाराष्ट्र व कोकणला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटामध्ये वारंवार दरड कोसळत असून, त्या घाटाचे रुंदीकरण होणे अत्यंत जरुरीचे आहे. त्या दृष्टीने प्रस्ताव सादर करा, अशीही मागणी केली. लांजा तालुक्यातील दाभोळे लांजा-साटवली रस्ता व लांजा-माजळ जावडे इसवली-पनारे रस्ता खराब झालेला आहे. 

त्या रस्त्याची आमदार डॉ. साळवी व शिवसैनिकांनी पाहणी केली. त्या वेळी वाहतुकीसाठी होणारी गैरसोय पाहता आमदार साळवी यांनी जड वाहतूक पालीमार्गे वळविण्याच्या सूचना केल्या होत्या तसेच त्या रस्त्यावरील खड्डे उन्हाळी डांबराने भरण्यास सांगितले. तसेच लांजा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीला १४ कोटी मंजूर झाले होते. त्याचे भूमिपूजनही झाले होते; परंतु भूमिपूजन होऊन अनेक महिने उलटूनही अद्याप काम सुरू झाले नाही. अणुस्कुरा घाटाच्या रूंदीकरणाचा विषय हॅम या योजनेत घेण्यात आला आहे. तसेच लांजा तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे उन्हाळी डांबराने भरून घेतले जातील, असे आश्वासन मुख्य अभियंता कुलकर्णी यांनी दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 PM 30/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow