रत्नागिरी शहर पथविक्रेता समितीचे पाच सदस्य बिनविरोध

Aug 31, 2024 - 10:22
Aug 31, 2024 - 11:00
 0
रत्नागिरी शहर पथविक्रेता समितीचे पाच सदस्य बिनविरोध

◼️ नामनिर्देशन पत्र दाखल न झाल्याने तीन सदस्य पदे रिक्त

रत्नागिरी : रत्नागिरी शहर पथविक्रेता समितीची पहिलीच सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. एकूण आठ सदस्यांपैकी पाच सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे. इतर तीन प्रवर्गातून नामनिर्देशनपत्रच दाखल न झाल्याने ती पदे रिक्त राहिली आहेत.

रत्नागिरी नगर पथविक्रेता समिती सार्वत्रिक निवडणुकीचे निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी काम पाहिले. सर्वसाधारण प्रवर्गातून सुहेल चंद्रकांत शिवलकर, सतीश नारायण मोरे, सर्वसाधारण महिला आरक्षित प्रवर्गातून अमित मृणाल वारंग, इतर मागास महिल प्रवर्गातून गौरी प्रतिश शिवलकर यांचं बिनविरोध निवड झाली आहे.

अनुसूचित जमाती प्रवर्ग अल्पसंख्यांक प्रवर्ग आणि दिव्यांग प्रवर्गातून नामनिर्देशन पत्रच दाखल न झाल्याने ही तीन सदस्यपदे रिक्त राहिली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी शुक्रवारी दुपारी बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांची नावे जाहीर करून त्या सदस्यांना प्रमाणपत्र दिली. २६ ऑगस्टपासून ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 31-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow