तटकरेंच्या विजयाचा मंडणगडमध्ये जल्लोष

Jun 5, 2024 - 09:40
 0
तटकरेंच्या विजयाचा मंडणगडमध्ये जल्लोष

मंडणगड : महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या विजयामुळे आनंदीत झालेल्या महायुतीच्या तिनही घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मंडणगड शहरातील मुख्य नाक्यात विजयोत्सव फटाके फोडून साजरा केला. 

या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, भाजप तालुकाध्यक्ष लक्ष्मण मोरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वैभव कोकाटे, दीपक मालुसरे, हरेश मर्चेंडे, नीलेश गोवळे, अनंत शिंदे, इरफान बुरोंडकर, संतोष पार्टे, चेतन सातोपे, भाई मालगुंडकर, अनंत शिंदे, यश मेहता, मुकेश तलार, मंगेश लाखण, प्रतीक पोतनीस, प्रवीण कदम, गिरीश जोशी, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रायगड लोकसभा मतदान क्षेत्रात विजयाचा गुलाल कोण उडवणार या विषयी गेल्या महिन्याभरापासून उत्सुकता होती. त्यातही महाविकास आघाडीने तटकरे यांच्यासमोर अनंत गीते यांचे आव्हान होते. महाविकास आघाडीस राज्यात मोठे यश मिळालेले असताना विजयाचा फॉर्म्युला रायगडमध्ये यशस्वी झाला नाही. खासदार तटकरे यांनी सलग दुसऱ्यावेळी नव्या सवंगड्यांसह ५ लाख ८ हजार ३५२ इतकी मते मिळवली. ८२ हजार ७६४ इतक्या विक्रमी मताधिक्याने निवडून आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 05-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow