गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज पावसमध्ये
पावस : येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आज (ता. ३०) गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पावसच्या दौऱ्यावर येत आहेत. स्वामींच्या मृत्यूपत्र या महाकाव्याचे प्रकाशन व अमृतानुभव या इंग्रजीत भाषांतर केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन गोविंदगिरी महाराजांच्या हस्ते होणार आहे.
आज सकाळी ५.३० वा. समाधी मंदिरात पुजेला मुख्यमंत्री डॉ. सावंत उपस्थित राहणार आहेत. ८ वाजता स्वामी समाधी मंदिर दर्शन, ९.३० वा. पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११.४५ वा. समाधी मंदिरात सत्कार समारंभ व दुपारी १२ वा. डॉ. सावंत हे स्वामीभक्तांशी संवाद साधणार आहेत. दुपारी १२.३० वा. महाप्रसाद घेऊन ते दुपारी चिपळूणकडे रवाना होणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 30-08-2024
What's Your Reaction?