लांजा : वेरवली बेर्डेवाडी धरणाचे काम ४१ वर्षांनी पूर्ण

Sep 2, 2024 - 11:46
 0
लांजा : वेरवली बेर्डेवाडी धरणाचे काम ४१ वर्षांनी पूर्ण

लांजा : सन १९८२-८३ साली सुरू झालेले बेर्डेवाडी धरणाचे काम २०२३-२४ मध्ये पूर्णत्वाला गेले आहे. मागील ४१ वर्षापासून सुरू असलेले बेर्डेवाडी धरण प्रकल्प पूर्णत्वाला कधी येणार, असा सवाल केला जात असताना लघु पाटबंधारे विभागाती संपर्क साधला असता धरणाचे काम पूर्ण झाल्याचा निर्वाळा देण्यात आला. त्यामुळे उन्हाळ्यात परिसरात उ‌द्भवणारी पाणी पाणी टंचाईवर मात आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक बेर्डेवाडी येथे लघुपाट बंधारे योजनेंतर्गत धरण प्रकल्प गेली ४१ वर्षे सुरू आहे. हा प्रकल्प आजही अपूर्णच असल्याचे बोलले जात होते. या धरण प्रकल्पामुळे परिसरातील बहुतांश जमिनी ओलिताखाली येणार असल्या तरी अधूनमधून सुरू राहणारे धरणाचे काम अजून किती काळ सुरू राहणार असा प्रश्न येथील जनतेला पडला होता. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन येथे नागरिकांना देण्यात आले होते. या धरणाचे काम पूर्ण कधी होते आणि येथील शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली केव्हा येणार याकडे वेरवली बुद्रुक आणि त्या पुढील गावांचे लक्ष लागून राहिले आहे. लघुपाटबंधारे विभागाकडून २०२३-२४ पासून हे धरण पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात येते आहे, त्यामुळे तब्बल ४१ वर्षे सुरू घरण क्षेत्र परिसरात सुरू असलेली टूक वाहतूक, क्रशर, उत्खनन पूर्णतः थांबले असून स्थानिक लोक नागरिकांना होणारा त्रास पूर्णतः थांबला आहे.

धरणाच्या सुरू असलेल्या कामाबाबत स्थानिक नागरिकांनी नाराजी दर्शवली होती. गेली ४१ बर्षे होऊन अर्धवट असणारा वेरवली बुद्रुक बेर्डेवाडी धरण प्रकल्प हा दीर्घ वेळ घेणारा जिल्ह्यातील एकमेव प्रकल्प अशा शब्दात नाराजी व्यक्त केली होती. अनेक वर्ष येथे सुरू असणारे वाहतूक, खणली गेलेली जमीन, डोंगर, रस्ते यांचा मोठ्या प्रमाणात -हास झाला असून हे सर्व वस्तीपासून जवळ असल्याने त्याचा परिणाम येथे जनजीवनावर अनेक वर्ष होत होता.

धरणाची उंची टप्पा वाढवण्याच्या नावाखाली धरणाचे काम सुरू होते. ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीने धरणाच्या कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार करून काम पूर्ण केव्हा होणार याबाबत विचारणा केली होती. मात्र, ग्रामस्थांची शंकांचे निरसन होईल अशी समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त केली जात होती. अखेर बेरवली धरणाचे काम पूर्णत्वाला गेले असून, नागरिकांनी सुस्कारा सोडला आहे.

२१.६८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा
लघुपाटबंधारे प्रकल्पांतर्गत ६०८.५० मीटर लांबीचे तर ५५.३६ मीटर उंचीचे धरण बांधण्यात आले आहे. या धरणामध्ये २१.६८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा साठवण्यात येणार आहे. धरणातून मुख्य कालवा काढण्यात आला असून त्याची १४ मीटर लांबी आहे. या धरणाच्या माध्यमातून वेरवली बुदुक परिसरातील १०८१ हेक्टर क्षेत्र जमीन सिंचनाखाली येणार आहे. धरणाचा उजवा व डावा असे दोन कालवे काढण्यात आले आहेत. एक मातीचा दुसरा सिमेंटचा असून त्याद्वारे गावात पाण्याचा विसर्ग होणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow