लांजा - दाभोळे मार्गावरील चिरे वाहतूक रोखली

Sep 2, 2024 - 11:21
 0
लांजा - दाभोळे मार्गावरील चिरे वाहतूक रोखली

लांजा : तालुक्यातील लांजा तळवडे- दाभोळे मार्गावरून राजरोसपणे अवजड चिरे वाहतूक विरोधात नागरिकांनी प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रारी केल्या होत्या. या मागनि अवजड चिरे वाहतूक बंद करण्याच्या सूचना असतानाही अवजड वाहतूक सुरू आहे. आ. राजन साळवी लांजा-आसगे-दाभोळे रस्त्याची पाहणी करत असताना त्यांना चिऱ्याची वाहतूक करणारे अवजड ट्रक दिसताच त्यांनी ट्रकला रोखून धरत वाहतूक पालीमार्गे वळविण्यास भाग पाडले.

आसगे- दाभोळे रस्ता हा आसगे तळवडे कुरचुंब गावापर्यंत मोठ मोठे खड्डे पडल्याने पूर्णतः खराब झाला आहे. या रस्त्याची झालेली दुरवस्था चिऱ्याची अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी सातत्याने संबंधित यंत्रणेकडे करण्यात आली असतानाही वाहतूक सुरू आहे. याची पाहणी आ. साळवी यांनी केली.

यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी जगदीश राजापकर, जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, लांजा शहाराध्यक्ष नागेश कुरुप, विभाग संघटक प्रसाद माने, चेतन खांदारे, शरद चरकरी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांच्याशी करणार चर्चा
वाहतुकीसाठी होणारी गैरसोय पाहता आ. राजन साळवी यांनी अवजड ट्रकला थांबवून हा ट्रक पाली मार्गे नेण्यास भाग पाडले. याबाबत आपण जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन अवजड वाहनांची वाहतूक बंद व्हावी यासाठी चर्चा करणार असून, रस्त्यावरील खड्डे हे डांबराने भरण्यात यावेत, अशा सूचना बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांना करणार असल्याचे संगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 02/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow