येळवण गावात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला खिंडार..!

Sep 2, 2024 - 11:53
 0
येळवण गावात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला खिंडार..!

◼️ किरण भैय्या सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत येळवण गावातील माजी पंचायत समिती सभापती यांच्यासह सरपंच ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

◼️ पक्षप्रवेशासाठी कु.अपूर्वा सामंत हिचे विशेष प्रयत्न
 
राजापूर : किरण भैय्या सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राजापूर तालुक्यातील येळवण गावातील माजी पंचायत समिती सभापती यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी शिवसेनेमध्ये प्रक्ष प्रवेश केला. 

या कार्यक्रमावेळी किरण भैय्या सामंत, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, तालुका प्रमुख दिपक नागले, तालुका संघटक भरत लाड, उप तालुका प्रमुख चंद्रकांत जानस्कर, युवा सेना तालुका प्रमुख सुनील गुरव, पक्ष निरीक्षक संदेश पटेल, पाचल उपसरपंच आत्माराम सुतार, उप विभाग प्रमुख महादेव गुरव, पाचल विभाग प्रमुख अमर जाधव, उपविभाग प्रमुख संतोष सावंत, ओझर सरपंच विकास रेगे, ओणी शाखाप्रमुख नितील माळी, वडवली शाखा प्रमुख नाना शेलार, परुळे गावचे शाखाप्रमुख दीपक सावंत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी राजापूर पंचायत समितीचे माजी सभापती सिताराम भानू जाधव, सरपंच दिपाली दिपक जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा संतोष पांचाळ, सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ आयरे, शाखा प्रमुख अशोक चाळके, उपशाखा प्रमुख रविकांत सुरेश शिर्के, बूथ प्रमुख अनंत तुकाराम साळवी, युवा कार्यकर्ते दिपक जाधव, गणपत मिशाळ, सुहास तरळ, दिपक मलुष्टे, संजय तरळ, श्रीधर शिंदे, सदानंद आयरे, सुभाष चव्हाण, मारुती आमटे, मोहन सकपाळ, अनंत साळवी, सचिन सकपाळ, अनंत मालप, संजय मडवी आदी पदाधिकाऱ्यांनी, ग्रामस्थांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीत आमच्या गावातून किरण भैय्या सामंत यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देऊ असा निर्धार यावेळी पक्ष प्रवेश करणाऱ्या ग्रामस्थांनी केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 02-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow