चिपळूण : युनायटेड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साकारले बाप्पा

Sep 2, 2024 - 15:52
Sep 2, 2024 - 15:56
 0
चिपळूण : युनायटेड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साकारले बाप्पा

माखजन : चिपळूण येथील परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल च्या गुरुकुल विभागामध्ये गुरुकुलातील विद्यार्थी आणि इयत्ता चौथीमधील विद्यार्थ्यांनी हस्तकौशल्यातून स्वतःच्या बनवलेल्या आकर्षक गणेश मूर्तीचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. यामध्ये विविध प्रकारच्या १५० मूर्तीचा समावेश होता.

गुरुकुल विभागामार्फत प्रेमजी भाई आसर प्राथमिक विभागातील चौथीच्या विद्याथ्यांसाठी 'माझा गणपती' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत इयत्ता चौथीच्या २८० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त व उत्साही सहभाग नोंदवला. कार्यशाळेत मुलांना शाडू मातीपासून गणपती तयार करणे विषयी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक गुरुकुलातील अध्यापक पराग लघाटे यांनी केले. 

कार्यशाळेतील गणपती मूर्तीसाठी लागणारी शाडू माती, रंग व अन्य साहित्य इत्यादी करिता लघाटे बंधू आरवली यांची कलाश्री मूर्ती शाळा आणि चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथील शिल्पकार संदीप राजाराम ताम्हणकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

या प्रदर्शनाला मुख्याध्यापिका स्वप्नाली पाटील, उपमुख्याध्यापक संजय बनसोडे, पर्यवेक्षक संदीप मुंडेकर त्याचबरोबर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका संगीता नाईक आणि सर्व विभागातील अध्यापकांनी भेट दिली. शाळा समिती चेअरमन अमित जोशी यांनी प्रदर्शन मांडणी व उपक्रमाबद्दल प्रत्यक्ष भेट देऊन विशेष कौतुक केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:20 PM 02/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow