शेतकऱ्यांचे किसान क्रेडिट कार्ड होणार डिजिटल

May 29, 2024 - 17:56
May 30, 2024 - 09:27
 0
शेतकऱ्यांचे किसान क्रेडिट कार्ड होणार डिजिटल

रत्नागिरी : कोकणातील शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी किसान क्रेडिट कार्ड आता डीजिटल करण्यात येणार आहेत. त्यानुसार महसूल, कृषी अशा विविध विभागांच्या समन्वयाने शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांचे ओळखपत्र तयार करण्यात येणार आहे.

या प्रणालीद्वारे शेतकऱ्याला कागदपत्र विरहीत आणि घरबसल्या अल्पमुदतीच्या कर्जासाठी अर्ज करता येतो. याशिवाय या आयडीमुळे त्यांना शासनाच्या अन्य योजनांसाठीही अर्ज करणे आणि लाभ घेणे सुलभ होणार आहे. एक रुपयात पीक विमा, जलयुक्त शिवार, सिंचनाच्या योजना, खत, निविष्ठा, बियाणी यांसह कृषी सामग्री आणि यंत्रे यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळणे सुलभ होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:54 29-05-2024


 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow