WTC 2025 Final Date : 'या' दिवशी रंगणार WTC 2025 फायनल! ICCकडून तारखांची घोषणा

Sep 3, 2024 - 15:57
 0
WTC 2025 Final Date : 'या' दिवशी रंगणार WTC 2025 फायनल! ICCकडून तारखांची घोषणा

आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम सामन्याची तारीख जाहीर केली आहे. क्रिकेटच्या पंढरीत आणि इंग्लंडचे ऐतिहासिक मैदान असलेल्या लॉर्ड्सवर 11-15 जून रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

गरज भासल्यास 16 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासातील हा तिसरा अंतिम सामना असेल आणि लॉर्ड्सवर पहिल्यांदाच विजेतेपदाची लढत होणार आहे.

आयसीसीच्या सीईओने या संदर्भात एक निवेदन जारी केले आणि म्हटले की, "वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल ही क्रिकेट जगतातील सर्वात कमी कालावधीतील सर्वात रोमांचक स्पर्धा बनली आहे. त्यामुळे, 2025 चा फायनलची तारीख जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ही वर्ल्ड टेस्ट क्रिकेटच्या वाढत्या आकर्षणाची ओळख आहे, ज्यामुळे चाहत्यांना त्याचे वेड लागले आहे, म्हणून मी लोकांना विनंती करतो की पुढच्या वर्षीच्या सामन्याची तिकिटे बुक करा."

WTC फायनलमध्ये भारताचा दोनदा पराभव

WTC ची पहिली फायनल 2021 मध्ये साउथॅम्प्टन येथे खेळली गेली होती, तर 2023 च्या विजेतेपदाची लढत ओव्हल मैदानावर झाली होती. आतापर्यंत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने अनुक्रमे 2021 आणि 2023 मध्ये हे विजेतेपद पटकावले आहे. दोन्ही वेळा भारताला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

पहिल्यांदा टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. 2025 चा अंतिम सामना कोणत्या संघांमध्ये खेळवला जाईल हे अद्याप निश्चित झालेले नाही. सध्या गुणतालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. येत्या काही महिन्यांत सर्वच संघ भरपूर कसोटी सामने खेळणार आहेत, त्यानंतर कोणते संघ विजेतेपदाची लढत खेळणार हे निश्चित होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:10 03-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow