भाजपा नेते नीलेश राणे यांच्या उपस्थितीत आज रत्नागिरीत हिंदू एकता सभेचे आयोजन

Sep 4, 2024 - 10:02
 0
भाजपा नेते नीलेश राणे यांच्या उपस्थितीत आज रत्नागिरीत हिंदू एकता सभेचे आयोजन

रत्नागिरी : सातत्याने हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाचा हुंकार देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे आक्रमक नेतृत्व माजी खासदार नीलेश राणे हे बुधवारी ४ सप्टेंबर रोजी रत्नागिरी मध्ये येत असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू एकतेच्या सभेचे आयोजन करण्यात आलं आहे.

हिंदुस्तान असं ज्या भूभागाला म्हटलं जातं त्या भूमीवर गेल्या काही वर्षांपासून हिंदूंवरच अन्याय होताना दिसतो आहे. हिंदूंची परंपरा असलेल्या देवदेवता, हिंदूंची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान सातत्याने होताना दिसत आहेत. अनेक बाबतीत हिंदूंना बाजूला केलं जात आहे. आपल्याच भूमीत न्यायासाठी झगडावं लागतं आहे. मात्र हा अन्याय आता सहन केला जाणार नाही. आता हिंदूंनी एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर हिंदुत्वाचा हुंकार देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार नीलेश राणे यांच्या सभेचे बुधवारी ४ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.
 
ही सभा रत्नागिरीच्या अंबर हॉल टीआरपी येथे संध्याकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेला हिंदू प्रेमींनी आणि हिंदू नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 04-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow