चिपळूण : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या

Sep 4, 2024 - 16:47
Sep 4, 2024 - 16:52
 0
चिपळूण : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या

चिपळूण : तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गालगत मौजे वालोपे (ता. चिपळूण) येथिल एच.पी पेट्रोल पंप येथे व्हेल माशाची उलटीची तस्करी करणारे चारजण चिपळूण वनविभागाच्या जाळ्यात सापडले आहे. या कारवाईत दोन वाहनांसह संशयित आरोपींना वनविभागाने ताब्यात घेतले असून वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या तस्करी प्रकरणी प्रकाश तुकाराम इवलेकर (वय वर्षे ६०, रा वेळवी ता. दापोली जि. २ रत्नागिरी), दिलीप पांडुरंग पाटील (वय वर्षे ५०, रा वेळवी ता. दापोली जि. रत्नागिरी), प्रविण प्रभाकर जाधव (वय वर्ष ४७ रा. मंडणगड ता. मंडणगड), अनिल रामचंद्र महाडीक (वय वर्ष ४७ रा. अडखळ ता. मंडणगड) अशा ताब्यात घेतलेल्या चार जणांची नावे आहेत. संशयित आरोपीकडून व्हेल मासा उलटी (Ambergris) २.८९२ कि. ग्रा.व शाईन गाडी क्रमांक MH-०८/९-३४६९, अॅक्टिव्हा गाडी क्रमांक MH-०८/BB-१०८४ जप्त करून घेतली आहे. ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींच्या विरुध्द वन्यजीव (सरंक्षण) अधिनियम १९७२ अन्वये वनरक्षक कोळकेवाडी यांच्याकडील प्र.गु.रि. ०२/२०२४, दि.०३/०९/२०२४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही मा. मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर मा. आर. एम रामानुजम सर, सौ. गिरिजा देसाई मा. विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण), सौ. प्रियंका लगड, मा. सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रं. शि. परदेशी, परिक्षेत्र वन अधिकारी, चिपळूण, श्री. आर. आर. पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी, फ़िरते पथक रत्नागिरी (चिपळूण), श्री. प्र. ग. पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी दापोली आणि वनक्षेत्रपाल सामाजीक वनिकरणचे श्री. एम. एम डबडे, श्री. एम. व्हि. पाटील, व श्री. सा. स. सावंत वनपाल, श्री. रा. द. खोत वनपाल दापोली, श्री. एन. एस. गावडे, वनपाल पाली, वनरक्षक श्री. राहुल गुंटे, श्री. अशोक ढाकणे, श्री. राणबा बंबर्गेकर, श्री. सुरज जगताप, श्री. सुरज तेली, श्री. अरुण माळी, श्री. विशाल पाटील यानी उपस्थित राहून कार्यवाही पार पाडली. सदर गुह्या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:16 PM 04/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow