देवरुखातील पथविक्रेत्यांची निवडणूक बिनविरोध

Sep 5, 2024 - 11:51
 0
देवरुखातील पथविक्रेत्यांची निवडणूक बिनविरोध

देवरूख : शहरातील सर्व नोंदणीकृत पथविक्रेत्यांची महाराष्ट्र पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम २०१४ तसेच कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशानुसार निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. ही निवडणूक बिनविरोध झाली.

देवरुख नगरपंचायत हद्दीतील नोंदणीकृत पथविक्रेत्यांमधून आरक्षण सोडतीप्रमाणे एकूण ८ जागांकरीता नामनिर्देशनपत्र मागविण्यात आली.

त्यापैकी महिला अनुसुचित जमातीकरिता राखीव असलेल्या प्रवर्गातून एकही उमेदवार नसल्याने उर्वरित ७ जागांकरिता एकूण ७ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरली.

मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती, परंतु नामनिर्देशन दाखल केलेल्या उमेदवारांपैकी कुणीही अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे मुख्याधिकारी चेतन विसपुते (निवडणूक निर्णय अधिकारी) यांनी जाहीर केले. बिनविरोध निवड झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे-अनुष्का चव्हाण (खुला प्रवर्ग महिला राखीव), आत्माराम खेडेकर (खुला प्रवर्ग), सुरेश तावडे (खुला प्रवर्ग), अभिजित चव्हाण (इतर मागास वर्ग), दत्ताराम खापरे (विकलांग व्यक्ती), कौसर बोदले (अल्पसंख्याक महिला राखीव), अशोक कदम (अनुसूचित जाती) यांची निवड झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 05/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow