चिपळूण : अलोरे येथे दानपेटी फोडताना एकाला रंगेहाथ पकडले
चिपळूण : तालुक्यातील अलोरे येथे गंगादेवी ग्रामदेवता मंदिरामध्ये मंदिरातील दानपेटीचे कुलूप दगडाने फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करीत असताना एकजण रंगेहाथ सापडला आहे. कृष्णा नारायण काजवे (वय ३७) असे त्याचे नाव आहे.
याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बापू शामलिंग गुरव यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, अधिक तपास शिरगाव पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 05-09-2024
What's Your Reaction?