अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मंडणगडवासीयांची मागणी

Sep 5, 2024 - 14:31
 0
अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मंडणगडवासीयांची मागणी

मंडणगड : खेड पोलिसांनी गेल्या आठवडयातील गांजा तस्करीच्या कारवाईत तालुक्याचा संबंध असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे बदलत्या काळात या तालुक्यात व्यसनाधीनतेचा विळखा पडतोय की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मंडणगडात गांजाची पाळंमुळं किती खोलवर गेली आहेत, याचा शोध घेण्याचे आव्हान यंत्रणांपुढे आहे.

८८ तालुक्याबाहेरीत आहेत. तरीही कायदा आणि सुव्यवस्थेच्यादृष्टीने यंत्रणा सतर्क असून, विविध स्तरावर याविषयी जागृती, माहिती देण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालयांत जनजागृती सुरू आहे. दामिनी पथकाच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न, समस्या जाणून त्यावर उपाययोजनात्मक कार्यवाही चालू आहे. नागरिकांशी संवादातून पोलिस यंत्रणा सुरक्षेच्यादृष्टीने सतर्क आहे. नितीन गवारे, पोलिस निरीक्षक, मंडणगड

गेल्या दोन दशकांत गाव ते लहान शहर असा प्रवास तालुक्यातील मंडणगड शहराने पूर्ण केला आहे. शहरीकरणामुळे विकासाबरोबरच गुन्हेगारीचे लोणही येथील सामाजिक जीवनात रूजू लागल्याचे गुन्हेगारी प्रकारावरून पुढे येत आहे. गाजा या अमली पदाथांची हाताळणी करणाऱ्यांची प्रकरणे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच होती त्याचा व्यापार म्हणता येईल एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा कारभार सुरू नव्हता. रात्रीच्या अंधारात चार भिंतीच्या आड किंवा निर्जन ठिकाणी या संदर्भात लहान-मोठ्या घटना घडल्या आहेत; मात्र मद्यसेवनाप्रमाणे हे प्रकार पुढे आलेले नाहीत. त्याची पाळेमुळे किती खोलवर रूजली आहेत, याचा शोध घेण्याचे आव्हान यंत्रणांपुढे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:59 PM 05/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow