जिल्हा परिषद, पालिका निवडणूका नव्या वर्षात होण्याची शक्यता

Sep 5, 2024 - 15:46
Sep 5, 2024 - 15:54
 0
जिल्हा परिषद, पालिका निवडणूका नव्या वर्षात होण्याची शक्यता

चिपळूण : लोकसभेची निवडणूक झाली आणि खासदार दिल्लीला गेले. विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर होणार आणि आमदार मुंबईला जाणार; परंतु आपल्याच गावातल्या, जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका आणि नगरपंचायतीवर काम करण्याची इच्छा असणाऱ्या इच्छुकांना मात्र नेत्यांच्या फक्त पालख्या वाहण्याची वेळ आली आहे. सध्याची परिस्थिती पाहता नव्या वर्षातच या निवडणुकींचा धुरळा उडण्याची शक्यता आहे.

राजकीय कार्यकत्यांमध्ये सध्या निरुत्साह पसरलेला आहे. इंडिया आघाडीतील कार्यकर्ते लोकसभेमुळे जरा उत्साहात आहेत; परंतु महायुतीच्या कार्यकत्यांना पदेही नाहीत आणि अन्य लाभ निवडक लोकांनाच त्यामुळे त्यांच्यातही नाराजी आहे. या आधीच्या नियोजनानुसार २० सप्टेंबरपर्यंत विधानसभेची निवडणूक लागून नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल, असा अंदाज होता. महाराष्ट्रातील ही निवडणूक आता डिसेंबर २०२४ मध्ये होणार आहे. तसे स्पष्ट संकेत केंद्रीय निवडणूक आयोगानेही दिले आहेत. चिपळूण पालिकेचे इच्छुक नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे विविध पक्षांचे इच्छुक कार्यकर्ते, पदाधिकारी या निवडणुकांची वाट पाहून धकले. चिपळूण पालिकेवर मागील तीन वर्षापासून तर पंचायत समितीवर अडीच वर्षांपासून प्रशासक राज आहे. चिपळूण शहरात तर फराळापासून किल्ल्यांच्या स्पर्धेपर्यंत, क्रिकेट स्पर्धेपर्यंत अनेकांनी गुंतवणूक केली. पालिका निवडणुका काही जाहीर होईनात. हीच परिस्थिती जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या इच्छुकांची झाली आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समित्या, पालिका निवडणुका नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते संधीच्या शोधात आहेत, ही वस्तुस्थिती आहे: परंतु या निवडणुका विधानसभेनंतर होतील, सध्या आम्ही विधानसभेवर लक्ष केंद्रित केले असून, त्यासाठी कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याचे काम सुरू आहे. - लियाकत शाह, चिपळूण तालुकाध्यक्ष काँग्रेस

जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुती विस्कटणार आहे. त्यामुळेच सत्तारूढ महायुती या निवडणुका घेण्यासाठी टाळाटाळ करत आहे. त्यामुळे पक्षासाठी राबणारा कार्यकर्ता नाराज झाला आहे. विलास चिपळूणकर, राष्ट्रवादी शरद पवार गट चिपळूण -

कारणे काहीही असतील तरीही या निवडणुकांना विलंब झाला आहे हे खरे आहे. सध्याच्या परिस्थितीत आता विधानसभा होणार असत्याने त्यानंतरच या सर्व निवडणुका होणार आहेत. आम्ही त्यासाठी तयारी केली आहे. - रियाज खेरटकर, युवक जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट

महापालिकेच्या निवडणुका महायुती सरकार जाणीवपूर्वक घेत नाही. परिणामी, आयुक्त कोणत्याही धोरणात्मक बाबींवर निर्णय घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे शहरांच्या विकासाता खीळ घालण्याची भूमिका महायुतीची असून, त्याचा परिणाम त्यांना विधानसभेला दिसेल. - शशिकांत मोदी, शहराध्यक्ष शिवसेना


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:10 PM 05/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow