रत्नागिरी : उत्तेजक औषधे बाळगणाऱ्या तरुणाला जामीन
रत्नागिरी : शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथे परवाना नसताना उत्तेजक औषधे बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. आरोपी साईराज रमेश भाटकर (रा. मिरजोळे, रत्नागिरी) याला सत्र न्यायालयाने ५० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.
साईराज भाटकर याच्या ताब्यातील ३ हजार ७०० रुपयांची औषधे पोलिसांनी -जप्त केली. त्याने आपल्या मिरजोळे एमआयडीसी येथील घरामध्ये उत्तेजक औषधांचा विनापरवाना साठा करुन ठेवला होता. तसेच ही औषधे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अथवा डॉक्टरांच्या औषध चिट्ठीशिवाय व्यायामशाळेत जाणाऱ्या मुलांना विक्री करण्यात येत होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार १६ ऑगस्ट रोजी पोलिसांनी साईराजच्या घरी छापा टाकला. यावेळी साईराजच्या घरामध्ये विविध उत्तेजक औषधांचा साठा आढळला. शेड्युल्ड एज प्रकारची औषधे त्याच्या ताब्यात सापडली. ही औषधे डॉक्टरांच्या शिफारशीशिवाय विकता येत नाहीत, तरीही बिगर चिठ्ठीची औषधे हा तरुण विकत असे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. १७ ऑगस्टपासून तो कोठडीत होता. त्याने रत्नागिरीच्या सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने त्याला ५० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. दर रविवारी पोलिसात हजेरी लावणे तसेच सरकार पक्षाच्या पुराव्यांमध्ये छेडछाड करु नये, यासारख्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवू नये, अशाही अटी सत्र न्यायाधीश अनिलकुमार मल्लिकार्जुन अंबाळकर यांनी घातल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:52 05-09-2024
What's Your Reaction?