पनवेल आणि मडगाव दरम्यान दोन अतिरिक्त गणपती उत्सव विशेष गाड्या

Sep 10, 2024 - 09:58
 0
पनवेल आणि मडगाव दरम्यान दोन अतिरिक्त गणपती उत्सव विशेष गाड्या

मुंबई : रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पनवेल ते मडगाव दरम्यान २ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

तपशील खालीलप्रमाणे आहेत...

मडगाव-पनवेल- मडगाव विशेष (२ सेवा)

01428 विशेष गाडी दि. १५.०९.२०२४ रोजी मडगाव येथून ०९.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी २२.१५ वाजता पोहोचेल.

01427 विशेष गाडी दि. १५.०९.२०२४ रोजी पनवेल येथून २३.४५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी ११.०० वाजता पोहोचेल.

थांबे : पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी.

संरचना : एक द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलित, २ तृतीय इकॉनॉमी वातानुकूलित, आठ शयनयान, पाच सामान्य द्वितीय श्रेणी (१ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह) आणि एक जनरेटर कार.

आरक्षण : ट्रेन क्रमांक 01428/01427

साठी बुकिंग विशेष शुल्कासह सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेस्थळावर दि. १०.०९.२०२४ रोजी सुरू होईल.

तपशीलवार थांबा आणि वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित डबे म्हणून चालतील आणि अतिजलद मेल/एक्सप्रेस ट्रेनसाठी लागू असलेल्या अनारक्षित सामान्य शुल्कासह यूटीएसद्वारे तिकिटे बुक केली जाऊ शकतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 10-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow