राजापुर : पाचल बाजारपेठ येथे सिलेंडर गॅस लिकेज होऊन स्फोट, वेळीच घराबाहेर पडल्याने कुटुंब बालंबाल बचावले

Sep 10, 2024 - 12:05
 0
राजापुर : पाचल बाजारपेठ येथे सिलेंडर गॅस लिकेज होऊन स्फोट, वेळीच घराबाहेर पडल्याने कुटुंब बालंबाल बचावले

राजापूर : राजापूर तालुक्यातील पाचल बाजारपेठ येथे घरातील सिलेंडर लिकेज होऊन झालेल्या दोन स्फोटात घरातील कुटुंब बालंबाल बचावले आहे.

सविस्तर वृत्त असे की, गुरुकृपा अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर भाड्याच्या खोलीत राहणारे डॉ. चौगुले यांच्या घरी रविवारी रात्री साडेआठच्या दरम्यान सिलेंडरची गॅस टाकी लिकेज झाल्याने छोटे मोठे दोन स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घरात असलेल्या दोन मुलांसह पती, पत्नी बाहेर पडल्याने सुदैवाने नुकसान टळले.

डॉ. क्रांतिकुमार चौगुले गेल्या दीड वर्षांपासून पाचल बाजारपेठेतील गुरुकृपा अपार्टमेंट येथील पहिल्या मजल्यावर राहतात, तालुक्यातील रायपाटण धामणपे गावी स्वतःचा दवाखाना असलेले डॉ. नेहमी प्रमाणे रात्री सव्वाआठच्या दरम्यान पाचल येथील त्यांच्या राहत्या घरी आले. बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होताना कसला तरी मोठा आवाज झाल्याने बाथरूम मधून बाहेर येऊन पाहता गॅस सिलेंडरची टाकी किचन कट्ट्याखाली पडून त्यातून गॅस लिकेज होतं असल्याचे निदर्शनास आले, काही क्षणातच गॅस घरभर पसरू लागल्याने दोन लहान मुलं आणि पत्नीला घेऊन इमारती खाली आले व सदर घटनेबाबत आजूबाजूला व पोलीस प्रशासनाला कळविण्यात आले.

सविस्तर माहिती अशी, की रविवारी आठ सप्टेंबर रोजी सकाळी नवीन गॅस ची टाकी शेगडीला जोडण्यात आली, त्यावर सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण बनवण्यात आले होते तोपर्यंत गॅस बाबत कसलीच अडचण आली नव्हती. रात्री सव्वाआठ च्या दरम्यान नेहमीप्रमाणे दवाखान्यातून घरी आलो असता घरी पत्नी व दोन लहान मुलं घरात बेडरूम मध्ये होते. बाथरूम मध्ये फ्रेश होण्यासाठी गेलो असता अचानक किचन मध्ये मोठा आवाज आल्याने मी बाथरूम मधून बाहेर आल्यावर किचन कट्ट्याखाली सिलेंडर ची टाकी खाली पडून सर्व गॅस बाहेर येतं असल्याचे निदर्शनास आले.

टाकीतील गॅस सर्व घरभर पसरत होता अश्यावेळी काय करावं सुचत नव्हते, क्षणाचाही विलंब न लावता पत्नी व मुलांना रूम मधून बाहेर इमारती खाली घेऊन आलो व घरमालक व रायापाटण पोलीस स्टेशन चे हेड काँस्टेबल तळेकर यांना कळवून घडलेल्या घटणेबाबत माहिती देऊन पाचल येथील गॅस एजन्सीवाल्याना माहिती दिली.

हे सर्व चालू असताना अजून एक मोठा स्पॉट झाल्याचा आवाज ऐकू आला. फ्रीज, लाईट बोर्ड, मिक्सर, फ्रूड ज्यूसर, प्लास्टिक भांडी, एक्वागार्ड, सहित सोपा, घरघुती उपकरणं मिळून एकूण लाखभर रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी सदच्या घटणेबाबत माहिती पाचल मंडळ अधिकारी संजय पवार, तलाठी सतीश शिंदे, श्रीराम गॅस एजन्सी राजापूर यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी येऊन झालेल्या घटनेचा तपास केला.

एकंदरीत या सर्व प्रकारात पाचल वीजकंपनी ची मेहरबानी असल्याने घटना घडली त्या वेळी विजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे सॉर्ट सर्किट झाले नसल्याने परंतू देवघरात असलेल्या दिव्याच्या आगीमुळे घरात सर्वत्र आग पसरली होती. यावेळी ग्रामस्थ सुधाकर वाघाटे, जितू गांगण, कोकण विदर्भ कोकण बँकेचे मॅनेजर ओमकार शेटगे यांनी घटना स्थळी जाऊन वेळीच आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला असं बोललं जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 10-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow