Breaking : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपद सोडणार?; पक्षनेतृत्वाला केली विनंती

Jun 5, 2024 - 14:48
 0
Breaking : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपद सोडणार?; पक्षनेतृत्वाला केली विनंती

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाल्यानंतर राज्यात भाजपला मोठा धक्का बसला. मागील लोकसभा निवडणुकीत २३ जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा मात्र अवघ्या नऊ मतदारसंघांमध्ये विजय मिळवता आला.

या पार्श्वभूमीवर आज भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. "विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनेचे पूर्ण वेळ काम करण्यासाठी मला सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करावं, अशी मागणी मी पक्षनेतृत्वाकडे करणार आहे," अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:14 05-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow