स्वतःला मोबाईलपासून दूर ठेवा अन् सर्वांगीण प्रगती करा : प्रा. माधव अकलंगे

Sep 11, 2024 - 11:53
 0
स्वतःला मोबाईलपासून दूर ठेवा अन् सर्वांगीण प्रगती करा : प्रा. माधव अकलंगे

राजापूर  : नकारात्मक विचाराने स्वतःला आपण मागे सारू शकतो. स्वतःला मोबाईलपासून दूर ठेवा अन् इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःचा मार्ग निवडून आवडीच्या क्षेत्रात करिअर करा. निश्चितच यशस्वी व्हाल, असा मौलिक सल्ला प्रा. माधव अकलंगे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कुणबी समाजोन्नती संघ राजापूर तालुका शाखा आणि ग्रामीण शाखा तालुका राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम दीपक नागले यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी मुंबईचे अध्यक्ष शिवाजी तेरवणकर, सचिव अनिल भोवड, राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे चेअरमन प्रकाश मांडवकर, समाज नेते रवींद्र नागरेकर, राजापूर अर्बन बँकेचे संचालक प्रकाश कातकर, चंद्रकांत जानस्कर, प्रकाश लोळगे, मधुकर तोरस्कर, भास्कर चव्हाण आदी उपस्थित होते.

या वेळी प्रा. अंकलगे म्हणाले, करिअरसाठी विद्यार्थ्यांकडून विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेण्याला सर्रासपणे प्राधान्य दिले जात आहे. विज्ञान शाखेत करिअरच्या असलेल्या संधीसोबत अन्य शाखांमध्येही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्याकडे विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष करू नये. स्पर्धा परीक्षेतील यशात आयुष्य बदलण्याची क्षमता आहे. त्यासाठी कठोर आणि नियोजनबद्ध मेहनतीसह सातत्याची आवश्यकता आहे. या प्रसंगी नागले, तेरवणकर, भोवड, सुरेश बाईत यांच्यासह अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रंसचालन जानस्कर यांनी केले.

आवडीच्या क्षेत्रात करिअर करा
करिअरसाठी विद्यार्थ्यांकडून विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेण्याला सर्रासपणे प्राधान्य दिले जात आहे. विज्ञान शाखेत करिअरच्या असलेल्या संधीसोबत अन्य शाखांमध्येही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्याकडे विद्याथ्यांनी दुर्लक्ष करू नये. आवडीच्या क्षेत्राची निवड करून त्यामध्ये करिअर करा, असा सल्ला प्रा. अकलेंगे यांनी यावेळी दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 9/11/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow