समग्र शिक्षा अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात पाच संगणक शाळा

Sep 12, 2024 - 13:59
 0
समग्र शिक्षा अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात पाच संगणक शाळा

संगमेश्वर : समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३ शाळा व २ गट साधन केंद्रांमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापित केल्या आहेत.

आधुनिक काळात टिकायचे असेल संगणक शिक्षणाची गरज भासते. त्यामुळे हा उपक्रम रत्नागिरीतील विद्यार्थ्यांसाठी पूरक ठरणार आहे. समग्र शिक्षा अंतर्गत राज्यातील २२९० शाळेमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापित केल्या असून प्रत्येक शाळेवर या संगणक प्रयोगशाळेसाठी एक इन्स्ट्रक्टर रुजू करण्यात आला आहे. आधुनिक काळात टिकायचे असेल तर संगणकाशी मैत्री करावी लागेल व ते शिकावं पण लागेल हे उद्दिष्ट समोर ठेवून प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, राज्य प्रकल्प संचालक आर विमला यांनी आयसीटी (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ३ शाळा व २ गट साधन केंद्रांमध्ये हा उपक्रम चालू आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांच्या सूचनेप्रमाणे आणि रत्नागिरी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी बी. एम. कासार (प्राथमिक) यांच्या मार्गदर्शनाने राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल अशी अपेक्षा शिक्षण विभागाकडून व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:28 12-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow