खेड : कशेडी हद्दीतील भोगाव मार्ग बनला धोकादायक

Jul 17, 2024 - 13:29
Jul 17, 2024 - 15:33
 0
खेड : कशेडी हद्दीतील भोगाव मार्ग बनला धोकादायक

खेड : मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी हद्दीतील भोगाव मार्ग धोकादायक स्थितीमध्ये आहे. मुसळधार पावसामुळे भोगावचा रस्ता हळूहळू खचत आहे. यामुळे वाहनचालकांचा जीव टांगणीवर आहे. जीव मुठीत धरूनच वाहनचालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. वर्षांनुवर्षे भोगावचा मार्ग पावसाळ्यात खचत असतानाही राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून ठोस उपाययोजनांचा अवलंब केला जात नसल्याने अपघातांसह दुर्घटनेचा धोका कायम आहे.

पोलादपूरपासून ९ किमी अंतरावर असलेला रस्ता दरवर्षी खचतो. यंदाही हीच परिस्थिती आहे रत्नागिरीच्या दक्षिण व मुंबईच्या उत्तर बाजूने २ फूट रस्ता पूर्णपणे खचला आहे. धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ता
खखचण्याची प्रक्रिया सुरू होऊन अंदाजे १०० मीटर अंतरात साडेतीन फूट खोलवर रस्ता खचत असल्याची बाब समोर आली आहे.

मार्ग सुस्थितीत आणण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग केवळ मलमपट्टी करत आहे. २५ जुलै २००५ च्या अतिवृष्टीदरम्यान या ठीकाणी माथ्यापासून रस्त्याच्या जोगत्वा भाग वेगळा होऊन रस्त्यावर कोसळला होता.

महाकाय दरडीमुळे रस्त्यावरच २५ फुटापर्यंत अक्षरशः डोंगरच निर्माण झाल्यानंतर जेसीबी, पोकलेनच्या साहाय्याने सलग १५ दिवसानंतर मार्ग मोकळा झाला होता. तेव्हापासून दरवर्षी पावसाळ्यात रस्ता खचण्याची प्रकिया कायम आहे. 

भोगाव हद्दीतील खचलेल्या मार्गावर बऱ्याचवेळा प्रमाण वाढले आहे. यामुळे घाट चढताना अवजड वाहनांना गतीच मिळत नसल्याने बऱ्याच वेळा हीच वाहने माघारी फिरून दरीत कोसळत आहेत.

पळचिल, महालगुर, रावतळी, कशेडी, मनवेधार, खवंटी गवळीवाडी, जलाचीवाडी, किंजळे, घोगरे, आडतामसडे, गोरेवाडी, ओवळी आडाचीवाडी, खडकवणे, गोलदरा, काळीबंगला, कामतवाडी पा गाववाड्यातील ग्रामस्थांसाठी हा मार्ग मुख्य वाहतुकीचा आहे. 

मार्गावरून दोन्ही दिशांना दिवसरात्र हजारो वाहने धावत असतात. भोगाव हवीतील मार्ग हळूहळू खचू लागल्याने साऱ्यांचाच जीव टांगणीला लागला आहे. कशेडी येथील महामार्ग वाहतूक पोलिसांना खचलेल्या मार्गावर
करडी नजर ठेवावी लागत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:57 PM 17/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow