लांजा आगारातील एसटी कर्मचारी आजपासून संपात सहभागी होणार

Sep 4, 2024 - 10:17
Sep 4, 2024 - 10:20
 0
लांजा आगारातील एसटी कर्मचारी आजपासून संपात सहभागी होणार

लांजा : आठवडा बाजार शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांची एसटीअभावी गैरसोय होईल हे लक्षात घेऊन लांजा आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपात सहभाग घेतलेला नाही, त्यामुळे मंगळवारचा संप तूर्तास स्थगित करण्यात आला. काळ सकाळपासून सर्व बस फेर्या सुरळीत सुरू होत्या, मात्र बुधवारी (ता. ४) सकाळपासून सर्व कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याचे कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले.

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे वेतन मिळावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. लांजा आगारातील सर्व गाडया काळ सुरळीत होत्या. या संपाचा कोणताही परिणाम काळ जाणवला नाही. विशेषकरून मंगळवारी असणारा तालुक्याचा आठवडा बाजार असल्याने व काही दिवसांवर गणपती बाप्पाचे आगमन आणि त्या निमिताने बाजारात आलेल्या तालुक्यातील जनतेची गर्दी तसेच शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थी यांची एसटी बंद झाल्यास गैरसोय होऊ नये, त्यांना त्यांच्या घरी सुखरूपपणे जाता यावे या दृष्टीने लांजा एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी कालच्या राज्यव्यापी संपात सहभागी न होता काल सर्व एसटी फेऱ्या सुरु ठेवल्या होत्या. बुधवारी सर्व एसटी कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. त्यांच्या या सहकाऱ्यांच्या भूमिकेमुळे काळ आगाराच्या सर्व एसटी फेऱ्या सुरु राहिल्याने ग्रामस्थांची कोणत्याही प्रकारे अडचण झाली नाही.

देवरूखात प्रवाशांची गैरसोय
साडवली ऐन गणेशोत्सवात राज्य परिवहन कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे. एसटी कर्मचारी संघटना राज्यभर बेमुदत आंदोलन करणार आहेत. यामध्ये देवरूख आगारातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसाठी एमटी कामगाराने संयुक्त कृती समितीच्यावतीने सेवा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसटीची वाहतूक विस्कळीत झाली असून, एसटीच्या संघामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. गणेशोत्सवात एसटी कर्मचान्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकरमान्यांचेही हाल होणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 04/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow