वडाच्या झाडावर बाप्पाची प्रतिष्ठापना

Sep 13, 2024 - 12:29
 0
वडाच्या झाडावर बाप्पाची प्रतिष्ठापना

सांगली : गुंडेवाडी (ता. मिरज) येथील जय हनुमान गणेशोत्सव मंडळाने वडाच्या झाडावर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. वृक्षतोड थांबवून पर्यावरणाच्या संवर्धनाची संस्कृती ग्रामस्थांत रुजावी यासाठी गेल्या १५ वर्षांपासून मंडळ हा उपक्रम राबवत आहे.

डीजेमुक्त गणेशोत्सव, एक गाव, एक गणपती उपक्रम, झाडे लावा झाडे जगवा, असा संदेश मंडळ देत आहे. हा वेगळा उपक्रम पंचक्रोशीच्या आकर्षणाचा विषय बनविला आहे. वडावरच्या गणेशाच्या पूजेसाठी ग्रामस्थ गर्दी करतात. दररोज सकाळी व सायंकाळी आरतीला गावकरी एकत्र येतात.

पाच हजार लोकवस्तीच्या या गावात गावातील तरुणांनी एकत्र येऊन ही अफलातून संकल्पना राबविली आहे. मंडप, सजावट, रोषणाई असा खर्च न करता वडाच्या झाडालाच गणेशाचे पूजास्थान बनविले. दोन फांद्यांच्या बेचक्यात जमिनीपासून २० फूट उंचावर मूर्तीचा स्थापना केली आहे.

गणेशोत्सव काळात दररोज हलगीच्या तालावर लेझीमसह पारंपरिक खेळ खेळले जातात. आरतीसाठी दोन कार्यकर्ते शिडीवरून झाडावर चढतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 13-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow