खेडमध्ये डेंग्यूसदृश रुग्ण

Sep 13, 2024 - 14:18
 0
खेडमध्ये डेंग्यूसदृश रुग्ण

खेड : शहरासह ग्रामीण भागात डेंग्यू साथीने पुन्हा डोके वर काढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. डेंग्यूसदृश रुग्ण खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणे पसंत करत असल्याने डेंग्यूसदृश रुग्णांचा नेमका आकडा समोर येत नाही. जुलै महिन्यात डेंग्यू साथीने थैमान घातले होते. शहरासह ग्रामीण भागात फैलावलेली डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यास आरोग्य यंत्रणेला यश आले होते. पुन्हा डेंग्यू साथीचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने ग्रामस्थ हतबल झाले आहेत. ऐन गणेशोत्सवातच डेंग्यूच्या फैलावाने ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:41 PM 9/13/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow