देवरुखात गणरायांना भावपूर्ण निरोप

Sep 13, 2024 - 10:25
Sep 13, 2024 - 16:31
 0
देवरुखात गणरायांना भावपूर्ण निरोप

देवरुख : 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या गजरात गौरी गणपतींचे विसर्जन गुरुवारी संगमेश्वर तालुक्यात शांततेने करण्यात आले. शहरातील सप्तलिंगी नदीपात्रात खालची आळी, बाजारपेठ, वरचीआळी व दत्तनगर परिसरातील गणरायांचे वाजत गाजत विसर्जन करण्यात आले. तर तालुक्यातील अन्य भागात गडगडीनदी, शास्त्रीनदी, सोनवी, अलकनंदा, काजळी, गडनदी अशा नद्यांमध्येही गणरायाला निरोप देण्यात आला.

देवरुख नगरपंचायतकडून कार्यालयाजवळ कृत्रिम विसर्जन घाट उभारण्यात आला. याचा वापरही गणेशभक्तांनी केला. नगरपंचायत व सामाजिक कार्यकर्ते यांनी नदीपात्रात गणपती विसर्जनस्थळी निर्माल्य कलश उभारण्यात आला होता. ढोल-ताशे व गुलालांची उधळण करत गणपती मिरवणूक काढण्यात आली. पावसाने उसंत घेतल्याने भक्तांना विसर्जन करताना आनंद व्यक्त करता आला. पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.

याचबरोबर राजू काकडे अॅकॅडमीचे कार्यकर्ते यांनी देवरुख विसर्जन घाटावर आपत्कालीन सोयींनीयुक्त कार्यकर्ते तैनात होते. अनेक भक्तांच्या गणपतींचे विसर्जन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:47 PM 9/13/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow