बांगला देशबरोबरचे क्रिकेट सामने रद्द करण्याची रत्नागिरीतील हिंदू जनजागृती समितीची मागणी

Sep 14, 2024 - 10:50
 0
बांगला देशबरोबरचे क्रिकेट सामने रद्द करण्याची रत्नागिरीतील  हिंदू जनजागृती समितीची मागणी

रत्नागिरी : आरक्षणाच्या मुद्यावरून बांगला देशमध्ये सुरू झालेल्या गृहकलहात केवळ हिंदू युवक, युवती, महिला, हिंदूचे धर्मग्रंथ, हिंदूंची मंदिरे यांनाच लक्ष करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत शेकडो हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या असून अनेक मंदिरांचा विध्वंस करण्यात आला आहे. त्यामुळे बांगला देशाबरोबरचे सर्व क्रिकेट सामने तत्काळ रद्द करा, अशी मागणी काल रत्नागिरी येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री, केंद्रीय परराष्ट्रमंत्री, भारत सरकार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्या नावे देण्यात आले आहे. यावेळी अरविंद बारस्कर, अजिंक्य केसरकर, अमितराज खटावकर, चंपालाल माळी, मुकेश माळी, ज्ञानेश्वर राऊत, देवेंद्र झापडेकर, तन्मय जाधव, विष्णू बगाडे, संजय जोशी आदी उपस्थित
होते. बांगला देशासोबत भारताचे क्रिकेटचे २ कसोटी सामने या वर्षी १९ सप्टेंबरला चेन्नई येथे, तर २७ सप्टेंबरला कानपूरमध्ये होणार आहेत, अशी माहिती प्रसिद्धिमाध्यमांतून समोर आली आहे. तेथील शेकडो हिंदूच्या चिता अद्याप शांत झालेल्या नसताना अशा प्रकारचे क्रिकेटचे सामने आयोजित करणे हा हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा संतापजनक प्रकार आहे, असे या निवेदनात म्हणण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 9/14/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow