चिपळूण सावकारी प्रकरण: राधा लवेकरचा जामीन अर्ज फेटाळला

Sep 14, 2024 - 10:50
 0
चिपळूण सावकारी प्रकरण: राधा लवेकरचा जामीन अर्ज फेटाळला

चिपळूण : कर्ज फेडल्यानंतर तारण म्हणून ठेवलेली कागदपत्रे सावकारी करणाऱ्या राधा लवेकर हिच्याकडे मागण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेशी वाद घालत जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी लवेकरविरोधात जातीवाचक शिवीगाळ व सावकारी प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २५ जुलैला घडली होती. लवेकरचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने १२ सप्टेंबरला फेटाळला. न्यायालयाने लवेकर यांना चिपळूण पोलिस ठाण्यात हजर राहण्यासंदर्भात आदेश केल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याबाबतची फिर्याद बहादूरशेख (चिपळूण) मधील एका महिलेने दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने कौटुंबिक अडचणीपोटी लवेकर हिच्याकडून काही महिन्यांपूर्वी २० हजार रुपये घेतले होते. या कर्जापोटी लवेकरने कर्जदार महिलेकडून तारण म्हणून आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, बॉण्ड पेपर अशी कागदपत्रे घेतली होती. काही महिन्यांनंतर कर्जदार महिलेने २० हजार रुपये कर्जापोटी लवेकर हिला ४३ हजार रुपये अदा केले. कर्जफेड झाली असल्याने तारण ठेवलेली कागदपत्रे लवेकर हिच्याकडे मागण्याचा त्या महिलेने प्रयत्न केला असता लवेकर हिने या महिलेशी वाद घालत जातीवाचक शिवीगाळ केली, असा दावा करत या महिलेने येथील पोलिस ठाण्यात सावकारी व अॅट्रॉसिटीप्रकरणी तक्रार दिली. यानंतर पोलिसांना लवेकर हिच्याकडे सावकारी करण्याचा कोणताही परवाना आढळून आलेला नाही. यामुळे तिच्या विरोधात सावकारी व अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 14-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow