Maharashtra Weather Update : आज पावसाची विश्रांती!

Sep 14, 2024 - 11:31
 0
Maharashtra Weather Update : आज पावसाची विश्रांती!

मुंबई : राज्यात मुंबईसह कोकणात पावसाच्या जोर आता काहीशा प्रमाणात विश्रांती घेताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अधूमधून येणाऱ्या पावसाच्या सरी आता कमी झाल्या आहेत. येत्या ४८ तास मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर आकाश अंशतः ढगाळ राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शहरात मागील काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे कमाल आणि किमान तापमानातही वाढ होताना दिसत आहे.

आयएमडीने दिलेल्या अंदाजानुसार, मान्सूनने आता परतीचा प्रवास सुरू केला असल्याने वातावरणात अनेक मोठे बदल होतांना दिसत आहेत. कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसरपासून दिल्ली तीव्र कमी दाबाचे केंद्र ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. दक्षिण गुजरात ते कर्नाटकपर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.

त्यामुळे येत्या २४ तासांत राज्यात अशंत: ढगाळ वातावरण असेल त्यामुळे आता आठवड्याच्या शेवटी शेतकऱ्यांनी उडीद आणि मुग पिकाची काढणी करून घ्यावी आणि कोरड्या जागी शेतमाल ठेवावा असा सल्ला देण्यात आला आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 14-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow