खेड : फुरूस प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नियुक्त

Sep 14, 2024 - 11:39
 0
खेड : फुरूस प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नियुक्त

खेड : तालुक्यातील फुरूस प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्य कमतरतेमुळे ग्रामस्थांची हेळसांड होत होती. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर प्राथमिक आरोग्य केंद्रात संगलट येथील डॉ. कायनात नाडकर रुजू झाल्या आहेत.

जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांनी नियुक्तीचे आदेश आहेत. तालुक्यातील संगलट येथील सामाजिक कार्यकर्ते हमीद नाडकर यांची कन्या असलेल्या डॉ. कायनात नाडकर यांनी एमबीबीएस पदवी प्राप्त केली आहे. फुरूस प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी रुग्णांची परवड सुरू होती. पंचक्रोशीतील रुग्णांना उपचारासाठी बऱ्याच वेळा खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत होता.

यामुळे ग्रामस्थांकडून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे कायमस्वरूपी एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी आग्रह धरण्यात आला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 9/14/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow