रत्नागिरी : अंगणवाडीमार्फत गरोदर माता व  बालकांना दिला जाणाऱ्या पोषण आहारच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

Sep 14, 2024 - 14:47
Sep 14, 2024 - 14:56
 0
रत्नागिरी : अंगणवाडीमार्फत गरोदर माता व  बालकांना दिला जाणाऱ्या पोषण आहारच्या  गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

रत्नागिरी : अंगणवाडीमार्फत गरोदर माता व  बालकांना दिला जाणारा पोषण आहार त्याच्या दर्जामुळे नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. आताही गरोदर माता व बालकांना दिल्या जाणाऱ्या टीएचआर पाकीटबंद आहाराच्या गुणवतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चविष्ट नाही म्हणून गरोदर माता व बालकही ती आहार घेत नाहीत, घेतला तरी तो खात नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
त्यामुळे या पाकिटबंद आहाराचे करायचे काय, या विवंचनेत अंगणवाडीताई आहेत.

महिला बालकल्याण विभागामार्फत अंगणवाडीच्या माध्यमातून तीन प्रकारच्या व्यतींसाठी आहार दिला जातो. त्यामध्ये गरोदर माता, स्तनदा माता, ९ महिने ते ३ वर्षे बालक आणि ३ वर्षे ते ५ वर्षे बालक यांचा समावेश आहे. ३ ते ५ वर्षे बालकांना अंगणवाडीत आहत शिजवून दिला जात आहे यामध्ये हरभरा, खिचडी, वाटाणा, इडली, मसाले भात असे पदार्थ बनवून खाऊ घातले जातात, तर गरोदर माता, स्तनदा माता आणि६ महिने ते ३ वर्षे बालकांना पाकीटबंद आहार दिला जात आहे. पूर्वी पाकीटबंद आहाराऐवजी तांदूळ, डाळ, हरभरा, गहू असा कोरडा आहार दिला जात होता. पण, चार महिन्यांपासून पूर्वी दिला जाणार कोरडा आहार बंद करण्यात आला असून, तो आता पाकीट बंद तयार देण्यात येत आहे. 

पाण्यात टाकून तो शिजवून खायचा आहे. मात्र, या पाकीटबंद आहाराबाबत तक्रारी असून, ही पाकिटे नेण्यास गरोदर व स्तनदा माता उत्सुक नाहीत. हा आहार चवीष्ट नाही, अशी त्यांची तक्रार आहे त्यामुळे गावोगावच्या अंगणवाडयांमध्ये टीएवआरची पाकिटे पडून आहेत. अंगणवाडीताईंना संबंधित लाभार्थीना वारंवार फोन करून आहाराची पाकिटे घेऊन जाण्यायायत सांगितले जात आहे. तरीही अनेजाण ती पाकिटे नेत नाहीत. त्यामुळे या आहार पाकिटांचे करायचे काय, या विर्वचनेत अंगणवाडी सेविका आहेत. पाकीटबंद आहार चविष्ट बनवायचा  कला, याबाबतही योग्य माहिती नसल्याने हा आहार पडून राहत आहे. हेतू साध्य होत नसेल तर यामध्ये आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. 

कोरडा आहार द्या..
पाकीटबंद तयार आहाराला पसंती नसल्याने अवहनाची पाकिटे अंगणवाडीत पडून राहत आहेत. कामकाजाचा भाग म्हणून ती संबंधित लाभार्थीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी अंगणवाडया सेविका पार पाडत आहेत. पण, घरी नेऊनड़ी ती आहार प्रत्यक्ष वापरात येत नसेल तर शासनाचा हेतु सफल होतोय का, हा प्रश्र आहे. गरोदर माता, स्तनदा माता आणि ६ महिने ते ३ वर्षे बालकांना पूर्वीप्रमाणे कोरडा आहार देण्यात यावा, अशी मागणी लाभार्थी महिलांकडून होऊ लागली आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:09 PM 9/14/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow